पान १३ते वयच वेडं असतं. शेखरच्या ह्या पवित्र्याचा तिला राग तर आला होता पण आपला हात सोडवावासाही वाटत नव्हतं. एखाद्या मुलीला स्पर्श करण्याची शेखरचीही ही पहिलीच वेळ होती. प्रश्न विचारून झाल्यावर तोही एकदम गडबडून गेला पण तोपर्यंत शालिनीने स्वत:ला सावरलं होतं. त्याच्या हातातून आपला दंड सोडवून घेत खाली पडलेली कॉलेजची बॅग उचलून


शेखरवर नको इतका विश्‍वास टाकून शालिनीने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. आता लग्नाशिवाय गत्यंतरच नव्हतं. अशा रितीने शालिनी शेखरची बायको म्हणून या घरात आली होती. तिच्या येण्याने शेखर निदान थोडाफार तरी सुधारेल अशी दिनकररावांना वेडी आशा होती पण शालिनी स्वत:च शेखरच्या एवढी प्रभावाखाली होती की, शेखरचं काही चुकतंय असं तिला वाटतच नसे. तिच्या दॄष्टीने "वडिलांनी पुतण्याएवढंच प्रेम पोटच्या मुलावर केलं असतं, तर तो असा वाया गेला नसता," एव्हढंच खरं होतं. तिची जमेची बाजू इतकीच की सासू म्हणून तिने दिनकररावांच्या पत्नीचा कायम मान राखला.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------