पान ११


"काका, सॉरी म्हटलं ना, मी. पुन्हा नाही असं करणार मी." देवदत्त अगदी काकुळतीला येऊन काकांची माफी मागत होते.

"असं वचन मला तू कित्येक वेळा दिलयंस देव पण एकदाही तू ते पाळलं नाहीस. काल तर कहरच झाला," दिनकरराव संतापून बोलत होते. देवदत्त ऑफीसमध्ये आल्या आल्या, दिनकररावांनी त्यांना आपल्या केबीनमध्ये बोलावून घेतलं होतं.

"मला मान्य आहे काका, मी चुकलो. पण मी तरी काय करू? शारदाला जाऊन आता एक वर्ष उलटून गेलंय पण तिला एक क्षणही विसरणं मला शक्य झालं नाहिये, मी...."

स्वत: निर्णय घेईन. शारदा घरात आल्यानंतर 'यज्ञ'ची भरभराटच झाली पण तिच्या जाण्याने 'यज्ञ' बुडाली, तर तिच्याही आत्म्याला क्लेश होत राहातील."

"शाब्बास! आज खूप दिवसांनी माझा देव मला परत मिळाल्यासारखं वाटतंय," दिनकरराव प्रसन्नपणे देवदत्तांचा हात हातात घेत म्हणाले.

...त्याचवेळी, दिनकररावांच्या केबीनबाहेर त्यांचं बोलण ऐकत उभा असलेला शेखर मात्र संतापाने हात चोळत होता.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------