पान १०


आपण इतकी प्यायलो की आपल्याला घरी येण्याचीही शुद्ध राहू नये?" देवदत्त स्वत:शीच विचार करत होते. सकाळी जाग आल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की आपण आपल्या बेडरुममध्ये आहोत पण तिथपर्यंत आपण कसे आलो, हे त्यांना काही केल्या आठवत नव्हतं.

"साहेब, लिंबू सरबत," हरीच्या आवाजासरशी देवदत्त भानावर आले. त्याच्या हातातून सरबताचा ग्लास घेत देवदत्तांनी त्याला प्रश्न केला.

"हरी, काल मी किती वाजता घरी आलो?""ग्रीन टाऊन? बरं. हरी, काका ऑफीसला गेले का?"

"ते तर आज आठ वाजताच गेलेत. तुम्ही उठलात की मला फोन करायला सांगून गेलेत." हरी म्हणला.

काकांनी हरीला फोन का करायला सांगितला असेल ते ओळखून देवदत्त म्हणाले, "नको करुस फोन, मी स्वत:च फोनवर बोलतो त्यंच्याशी. तू जा, माझा ब्रेकफास्ट घेऊन ये."

हरीला खाली पिटाळल्यावर हाताला झालेल्या जखमेकडे बघत देवदत्त पुन्हा विचारात गढून गेले, "ग्रीन टाऊन कॉम्प्लेक्सपाशी आपलं काय काम होतं..? आपला रोजचा रस्ता तर वेगळीकडेच आहे..."

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------