पान ९


“युवर ऑनर, माझे सहकारी मित्र बॅ. नंदकिशोर खंदारे यांनी या खटल्याची पार्श्वाभूमी इतकी सुंदर सांगितली आहे की मला त्यांनाच विचारावंसं वाटतं की प्रास्ताविक मांडताना त्यांनी जी स्टेटमेंट्स केली आहेत, उदाहरणार्थ, प्रियाने असं ठरवलं, दिपकला असं वाटलं, प्रियाने हा विचार केला, हे सगळं त्यांनी कशाच्या आधारावर ठरवलं?”समीरने असं म्हटल्यावर बॅ. खंदारे कान टवकारून समीर काय म्हणतोय ते ऐकू लागले.

“सरकारी वकिलांच्या प्रास्ताविकानुसार आरोपीने स्वत:जवळ रामपुरी चाकू बाळगला होता आणि तोच चाकू तिने मयत दिपकच्या पाठीत खुपसला. प्रत्यक्षात दिपक बागवेचा खून ज्या चाकूने झाला तो रामपुरी चाकू नसून बटण चाकू आहे.”

समीरचं वाक्य संपलं आणि बॅ खंदारे मनातल्या मनात चरफडले. त्यांच्या बोलण्यातील चूक हेरून समीरने त्याचं बरोबर भांडवल केलं होतं.

“दॅट्स ऑल युवर ऑनर, “अंदाजांच्या आधारे प्रास्ताविकात लांबलचक भाषणं ठोकून कोर्टाचा वेळ घेणं मला आवडत नाही.” समीरने आणखी एक टोला हाणला.

कोर्टाला अभिवादन करून समीर खाली बसला. त्याने हळूच बॅ. खंदार्‍यांकडे एक चोरटा कटाक्ष टाकला. ते रागाने समीरकडेच पाहत होते. मोठ्या मेहनतीने त्यांनी भाषण तयार केलं होतं. पण त्यांचं भाषण म्हणजे केवळ टाईमपास होता असं अप्रत्यक्षरित्या म्हणून समीरने त्यांचा पार कचरा करून टाकला होता. त्यांच्या प्रास्ताविकाला काटशह देऊन समीरने त्यांचा आत्मविश्वाकस डळमळीत केला होता. त्याच्या परिणाम ते साक्षिदाराला विचारणार असलेल्या प्रश्नोत्तरांवर होणार होता आणि समीरला तेच हवं होतं. बॅ खंदार्‍यांनी आपला पहिला साक्षिदार बोलावला.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------