पान ८


दिपकने आपल्याला निराळ्याच ठिकाणी आणलेलं पाहून प्रिया चिडली. प्रिया व दिपकमध्ये वाद सुरू झाला. वाद हळूहळू वाढत त्याचं रुपांतर भांडणात झालं. रागाच्या भरात दिपक बोलून गेला की इतके दिवस त्याने तोंड बंद ठेवलं पण जर प्रियाने त्याला फसवलं तर तो तिच्या नाशिकच्या केसची बातमी तिच्या ऑफिसमधे सर्वांना सांगेल आणि तिची नोकरी घालवेल. हे ऐकताच प्रिया रागाने कारच्या बाहेर पडली.“आरोपीच्या वकिलांना काही बोलायचं आहे?” जज्ज सिन्हांनी समीरकडे पहात विचारलं.

“येस युवर ऑनर,” म्हणत समीर आपल्या जागेवरून उठला. उठताक्षणी त्याची सहा फूट उंची नजरेत भरत होती. त्याच्या डोळ्यांमधील शांत भाव कोणत्याही व्यक्तिला दिलासा देणारे होते. चेहेर्‍यावरचं हास्य त्याच्या मिश्किलपणाची साक्ष देत होतं.

कोर्टाला अभिवादन करून समीरने बॅ. खंदार्‍यांकडे पाहिलं. खंदारे समीरकडे पाहून पुन्हा तुच्छपणे हसले. साहजिकच होतं ते. समीर नवखा वकील होता. खंदार्‍यांसारख्या मुरलेल्या वकीलासमोर त्याचा पाडाव लागणं कठीण होतं पण समीरच्या बाजूने दोन गोष्टी जमेच्या होत्या. एक म्हणजे त्याचा आत्मविश्वांस आणि दुसरी परिस्थितीचं योग्य मूल्यमापन करण्याची योग्यता. चेहेर्याचवरचं मिश्किल हास्य कायम ठेवून समीरने बोलायला सुरुवात केली.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------