पान ७


अतिशय हिशोबी वृत्तीने तिने अमोल प्रभाकर या तरूणाची निवड केली. अमोलभोवती प्रेमाचं जाळं विणत असताना तिने मनोज ठाकूर व दिपकसोबतच्या प्रेमप्रकरणांची माहिती गुप्तच ठेवली होती.

प्रिया आपल्या मागे आहे हे अमोलला माहित होतं पण त्याने प्रियाला प्रतिसाद दिला नाही. अमोलने नकार दिला असला तरी प्रियाने अमोलला प्रपोज केलं आहे, हे दिपकच्या कानापर्यंत आलं होतं. तो प्रियाला याचं उत्तर विचारण्याच वाटच पहात होता, म्हणून प्रिया आता दिपकला टाळू लागली. त्याचा फोनही अटेंड करेनाशी झाली. प्रियाच्या या वागण्यामुळे दिपक चिडला आणि प्रियाला जाब विचारण्याची संधी शोधू लागला. त्याच्या नशिबाने त्याला ही संधी मिळाली. प्रियाच्या घराच्या रूटवरच दिपकची गाडी लावलेली असायची त्यामुळे प्रियाला नाईलाजाने का होईना, दिपकच्याच गाडीतून ड्रॉप घ्यावा लागत असे. पण रोज ती एकटी सापडत नसे. मात्र, २५ ऑगस्टला प्रियाला शेवटचा ड्रॉप घेणं भाग पडलं आणि दिपकला हवी तशी संधी मिळाली.”ज्या दिवशी प्रियाचा शेवटचा ड्रॉप होता, त्यादिवशी दिपकने तिला जाब विचारायचं ठरवलं. नाईट शिफ्ट असल्यामुळे रात्री अडीचच्या सुमाराला घरी जाताना झोप अनावर होणं साहजिकच आहे. प्रियाही अशीच गाडीत झोपलेली आहे असं पाहून दिपकने आधीच पाहून ठेवलेल्या ठिकाणी गाडी वळवली आणि प्रियाला झोपेतून जागं केलं.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------