पान ६


आरोपी नाशिकला रहात असताना, तिचे मनोज ठाकूर नावाच्या तरूणाशी प्रेमसंबंध होते. मनोज ठाकूर आणि प्रिया जगताप यांचे प्रेमसंबंध दोन वर्ष सुरळीतपणे सुरू होते. एके दिवशी अचानक मनोज ठाकूरने आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी मनोज ठाकूरच्या कुटुंबियांकडून प्रिया जगतापवर एक केस दाखल करण्यात आली होती. मनोजला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात गुरफटवून मग त्याला फसवल्याचा आरोप होता प्रियावर.

बोलावणं आलं. दिपक नोकरीसाठी मुंबईला निघून आला. म्हणून प्रियानेही मुंबईच्याच ’कॉलइंडिया’ या कॉल सेंटरमध्ये नोकरीसाठी अप्लाय केलं आणि तिच्या सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, तिने ज्या कॉल सेंटरला नोकरीसाठी अर्ज केला होता, नेमकं त्याच कॉल सेंटरला दिपक ड्रायव्हर म्हणून पिक अप आणि ड्रॉपसाठी गाडी चालवत होता. प्रिया आणि दिपकच्या गाठीभेटीत पूर्वी जर काही अडथळा होताच, तर तोही आता दूर झाला.

दिपकच्या पाठोपाठ नोकरीसाठी मुंबईला आलेल्या प्रियाला मुंबई चांगलीच आवडली. इथलं राहणीमान, नोकरीमुळे हातात खेळणारा पैसा आणि स्वतंत्र आयुष्य याची तिला चटक लागली आणि आरोपीच्या चंचल वृत्तीने पुन्हा उचल खाल्ली. तिच्या लक्षात आलं की दिपकसारख्या फाटक्या तरूणावर प्रेम करण्यापेक्षा या शहरात कितीतरी देखणी आणि श्रीमंत मुलं आपल्याला मिळू शकतात. मग तिने आपला मोर्चा आपल्याच कॉल सेंटरमधील तरूण मुलांकडे वळवला.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------