पान ४


दिपक मान आवळत तिच्या शरिरावरून बाजूला झाला. प्रिया आपला स्कर्ट सावरत उठली. बाजूला कण्हत पडलेल्या दिपकच्या पोटात तिने एक जोरदार लाथ मारली. तो कळवळला. प्रियाने चोहिकडे पाहिलं. तिला तिथून बाहेर पडायचं होतं.त्याच वेळी विजेचा एक लोळ कडाड्कन चमकून गेला. दिपकच्या पाठीत खुपसलेल्या चाकूची मूठ त्या विजेच्या प्रकाशात प्रियाला स्पष्ट दिसली होती. तिच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली.

“चाकू....? चाकू तर आपणच लांब फेकून दिला होता ना...? मग...?”

भीतीने तिच्या अंगावर सरसरून काटा आला. तिने एक आंवढा गिळला. आजूबाजूला पहाण्याचंही धाडस तिला होत नव्हतं. कसंबसं स्वत:ला सावरत, त्या रानातून बाहेर पडण्यासाठी ती पुन्हा मागे वळली. चिखलात धडपडत, वाटेत येणा-या काटेरी झुडुपांनी स्वतःला ओरबाडून घेत, त्या आडरानातून वाट काढत, प्रिया मेन रोडवर पोहोचण्याचा प्रयत्न करत होती....


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------