पान ३१


दिपक तोल सावरत तिच्यापर्यंत पोहोचला पण त्याला काही बोलता सुद्धा आलं नाही. प्रियाच्या पुढ्यातच कोसळला तो. प्रिया घाबरून किंचाळली आणि पुन्हा बाहेरच्या दिशेला पळाली.महेशच्या केसचा निकाल लागल्यावर एके दिवशी प्रिया समीरला त्याच्या घरी येऊन भेटली.

“समीर, माझ्यासाठी तुम्ही जे केलंत त्याची परतफेड म्हणून तुम्हाला देण्यासाठी आज माझ्याकडे काही नाही. पण तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. मला जमेल तसं....” प्रियाच्या गळ्यात हुंदका दाटून आला. समीरने पुढे होऊन प्रियाच्या खांद्यावर हात ठेवला.

“प्रिया, मी तुला आधीच सांगितलं होतं ना? सरकारने जरी मला तुझा वकील बनवलं असलं, तरी तू निर्दोष आहेस याची मला खात्री होती म्हणूनच मी इतक्या पुढे जाऊन चौकशी केली. माझ्या फीची चिंता करू नकोस तुझ्यासारख्या प्रामाणिक आणि हुशार मुलीला निष्कलंक आयुष्य जगता येण्यात माझा हातभार लागला एवढं पुरेसं आहे माझ्यासाठी.”

“समीर, आणखी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. म्हणजे, तुम्हाला जमत असेल तर....”

“बोल ना?”

“माझ्या गळ्यातलं लॉकेट अजूनही पोलिसांकडेच आहे. मला ते परत मिळवून द्याल? मनोजची ती एकमेव आठवण आहे माझ्याकडे.” प्रिया गालावर ओघळलेले अश्रू पुसत म्हणाली.

समीर प्रियाकडे एकटक पहात होता.

“कधी कधी असं वाटतं समीर की मनोजनेच त्या दिवशी वाचवलं मला. मला शेवटचं भेटला तेव्हा ’गॉड ब्लेस यू’ असं म्हणून त्याने माझ्या गळ्यात घातलेलं लॉकेट माझ्यासोबत नसतं, तर कदाचित त्या रात्री....”

समीरने काही न बोलता आपल्या हाताची मूठ तिच्यासमोर उघडली. त्याच्या हाताच्या तळव्यावर प्रियाच्या गळ्यातलं लॉकेट होतं.

“समीर!” प्रिया अत्यानंदाने उद्घारली.

“तु ह्या लॉकेटबद्दल विचारणार हे मला माहित होतं म्हणून मीच इन्स्पेक्टर राजेंना सांगून त्यांच्याकडून ते ते मिळवलं.”

“थॅंक यू समीर. थॅंक यू व्हेरी मच!”

“गॉड ब्लेस यू, प्रिया.” समीर मंदस्मित म्हणाला.


----- समाप्त -----

----- या कथेवरील अभिप्राय / प्रतिक्रिया येथे नोंदवाव्यात. -----

Share this post:

1 comments

  1. Kanchan Karai // May 13, 2012 at 11:03 PM  

    ही कथा या ब्लॉगवर येथून पुन:प्रकाशित करण्यात आली आहे. या कथेवर पूर्वी मिळालेल्या प्रतिक्रिया येथे वाचता येतील.

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------