पान ३०


शेवटी रस्ता सापडला! पुन्हा एकदा प्रियालाच बळी बनवावं लागणार होतं पण काही हरकत नव्हती. दिपकचा काटा काढण्याचा याहून सुंदर मार्ग मला दुसरा सापडला नव्हता.

मी दिपककडे प्रियाचा विषय काढला. दिपकही प्रियाकडे आकृष्ट झालेला दिसत होता. पण प्रियाने जिथे मनोजची डाळ शिजू दिली नाही तिथे दिपकची काय कथा? मी त्याला

प्लॅनप्रमाणे ज्या दिवशी प्रियाचा शेवटचा ड्रॉप असेल, त्यादिवशी दिपक मला फोन करून ही सूचना देणार. मग मी प्रियाच्या आधी जो कुणी गाडीतून उतरणारा असेल, त्या व्यक्तिच्या एरियात दिपकच्या गाडीची वाट पहायची असं ठरलं होतं. प्रिया गाडीत एकटी उरल्यावर दिपकने काही ना काही कारण काढून दोन-तीन मिनिटं गाडी थांबवायची होती, म्हणजे मला डिकीत शिरता आलं असतं. त्यानंतर गाडी जी थांबणार ती सरळ अशा आडरानात जिथे प्रियाची किंकाळीही बाहेर जाऊ शकणार नाही. प्रियाचा सो कॉल्ड बॉडीगार्ड अमोल प्रभाकर ज्या दिवशी सुटीवर असेल, तो दिवस आमच्या प्लानसाठी सर्वात योग्य होता. पण

प्रियावर बलात्कार झाला काय आणि न झाला काय मला काहीच फरक पडत नव्हता. कोणत्याही परिस्थितीत मला दिपकला जिवंत सोडायचं नव्हतं. प्रियाने दिपकवर हल्ला केला आणि दिपकला ढकलून देऊन ती कारच्या दिशेने पळाली. दिपक तिला पुन्हा पकडण्यासाठी उठला. त्याचवेळी मी मागून येऊन त्याच्या पाठीत चाकू खुपसला. दिपकने वळून मला पाहिलं आणि त्याला परिस्थितीची कल्पना आली. मी त्याला ढकलून दिलं पण तो चिवट निघाला. पुन्हा उठून तो कारच्या दिशेने धावू लागला. मीही दिपकच्या मागून पळत होतो. तेवढ्यात मला प्रिया कारच्या जवळ दिसली. मी पटकन एका झाडामागे लपलो.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------