पान ३


....पुढचा प्रसंग त्याला अनपेक्षित होता. प्रियाने ऐनवेळी प्रसंगावधान राखून, त्याच्या नाकावर आपलं डोकं कस्सून आपटलं.

"ऑ....!" हातातला चाकू टाकून नाक दाबत दिपक मागे सरकला. त्याच्या नाकातून रक्त ओघळू लागलं होतं. त्या संधीचा फायदा घेऊन, प्रियाने त्याचा बाजूला पडलेला चाकू लांब फेकून दिला आणि पुढे होऊन दिपकला चिखलात ढकललं. तिने पळण्यासाठी पुढे उडी मारली पण तिने पाऊल उचलताच, दिपकने पडल्यापडल्या तिचा पाय हाताने खेचून तिला पालथं पाडलं.इतका वेळ तिच्या लक्षातच आलं नव्हतं हे!

उजव्या हाताने चाचपडत तिने आपल्या गळ्यातल्या लॉकेटमधून एक छोटसं पातं सर्र्कन बाहेर काढलं आणि मागचा पुढचा काही विचार न करता, तिच्या शरिरावर व्यापलेल्या दिपकच्या मानेत खुपसलं.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------