पान २९


“तू आपल्या सख्ख्या भावाचा खून केलास?” इन्स्पेक्टर राजेंनी महेशला विचारलं.

समीरवर कोर्टात खूनी हल्ला केल्यानंतर इन्स्पेक्टर राजेंनी महेशला ताब्यात घेतला होता. प्रियाची अर्थातच निर्दोष सुटका झाली होती आणि आता महेशवर केस स्टॅन्ड करण्यासाठी इन्स्पेक्टर राजे महेशचा जबाब नोंदवून घेत होते.

असताना त्याला मी गाठलं. मुद्दामच प्रियाचा विषय काढला. तो विषय काढताच मनोज उदास झाला. त्याला पुन्हा मुडमधे आणण्यासाठी म्हणून मी माझ्या घरी न जाता त्याच्यासोबत बंगल्यावर गेलो. मनोजचं बेडरूम बंगल्याच्या मागच्या बाजूला आहे आणि मागच्या बाजूने ये-जा करण्यासाठी त्याला निराळा जिनाही आहे त्यामुळे मी मनोजबरोबर त्याच्या रूममधे गेलोय, हे मनोजशिवाय कुणालाच कळलं नाही.

आणि परिस्थिती पालटली. दिपकने पैशाची मागणी केली. मी एक-दोनदा पैसे पाठवले पण एकदम मोठी रक्कम देणं मला शक्य होणार नव्हतं. मनोजच्या नावावर असलेली इस्टेट माझ्या नावावर होण्यास काही काळ लागणार होता. म्हणून मी मुंबईला येऊन दिपकला भेटलो. त्याच्यात बराच बदल झालेला दिसला. संधी मिळाली तर दिपक मला त्याच्या हातातलं बाहुलं बनवायला कमी करणार नाही हे मी समजून गेलो. दिपकचा काटा काढणं भाग झालं. पण कसं ते मला सुचत नव्हतं. मी विचार करत होतो.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------