पान २७


एक पंचवीस-सव्वीस वर्षांचा तरूण साक्षिदाराच्या पिंजर्‍यात येऊन उभा राहिला. मान खाली घालूनच तो उभा होता. समीरने त्याला पहिला प्रश्न विचारला.

“मि. ठाकूर, प्रिया जगतापशी तुमची ओळख किती वर्षांपासूनची आहे?”

“मी तिला गेली ४-५ वर्षं माझ्या भावासोबत फिरताना पाहिलं होतं.”

“तुमच्या भावाने म्हणजे मनोज ठाकूरने आत्महत्या केल्यानंतर आरोपीवर फसवणूकीची केस दाखल करण्यात तुमचा पुढाकार होता?"“का? का पण असं...?” बॅ. खंदार्‍यांनी प्रश्‍न विचारण्याची संधी सोडली नाही.

“कारण महेश ठाकूरचा ह्या केसशी जवळचा संबंध आहे.” समीर ठाम स्वरात म्हणाला.

“पण ही केस सुरू होताना तुम्हीच म्हणाला होतात ना, की आरोपीच्या पूर्वायुष्याचा या केसशी संबंध नाही म्हणून?”

“नो! मी म्हणालो होतो की आरोपीच्या पूर्वायुष्यात जे काही घडलं त्याचा या केसशी संबंध नाही. पण त्या केसचा ह्या केसशी फार जवळचा संबंध आहे.”

“अच्छा! मग सिद्ध करा ना!”

“तेच करत होतो, तर तुम्ही मधेच प्रश्न विचारलात.”

बॅ. खंदारे काही न बोलता खाली बसले. समीरने पुन्हा बोलायला सुरूवात केली.

“युवर ऑनर, कृपया महेश ठाकूर यांच्या बोटांचे ठसे गाडीच्या डिकीवर मिळालेल्या ठशांशी तपासून पहावेत.”


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------