पान २५


बॅ. खंदारे बसल्या जागी चुळबूळ करत होते. केस त्यांच्या हातातून जाण्याची लक्षणं दिसत होती. पण आता त्यांना काहीच करता येणं शक्य नव्हतं.

केसच्या सुरूवातीला त्यांनी एक दमदार प्रास्ताविक ठोकलं. पण तेवढंच ते. त्यानंतर त्यांनी केलेली प्रत्येक खेळी समीरच जिंकत गेला होता. आता तर केवळ उपचार म्हणून ते साक्षिदारांना बोलावणार होते.

“डॉ. प्रशांत सातपुते.”

“डॉ. सातपुते, सरकारी डॉक्टर म्हणून प्रेताचं पोस्टमार्टेम तुम्हीच केलंत?”

“हो.”

“काय आढळलं तुम्हाला पोस्टमार्टेममध्ये?”

“पाठीत खुपसलेल्या चाकूमुळे अति रक्तस्त्राव होऊन दिपकला मृत्यू आला होता.”

“मृत्यूची वेळ सांगता येईल?”

“पहाटे साडे तीन ते चारच्या दरम्यान.”

“थॅंक यू. क्रॉस.” बॅ खंदा-यांनी समीरला खूण केली.

समीर सावकाशपणे चालत साक्षिदाराच्या पिंजर्यांपाशी गेला.

“डॉ. सातपुते, मयताच्या पोस्टमार्टेमसंबंधीचे प्रश्न मी तुम्हाला नंतर विचारीन. मला आधी सांगा, सरकारी डॉक्टर म्हणून आरोपीची वैद्यकीय तपासणीही तुम्हीच केलीत?”

“हो.”

“काय आढळलं तुम्हाला तपासणीमधे?”“या सर्व जखमांमधील कोणती जखम प्राणघातक होती?”

“मी मघाशीच सांगितलं की पाठीत खुपसलेल्या चाकूमुळे अति रक्तस्त्राव होऊन दिपकला मृत्यू आला, म्हणजेच पाठीत खुपसलेल्या चाकूने झालेली जखम ही प्राणघातक होती.”

“मग मयताच्या गळ्यात खुपसलेल्या त्या पात्याचं काय?”

“त्या पात्याच्या वाराने मयताला जखम जरूर झाली पण रक्तस्त्राव होऊन प्राण जावेत इतकी मोठी जखम नव्हती ती.”

“तुमच्याआधी सकाळच्या सेशनमधे फिंगर प्रिन्ट एक्सपर्ट दिलीप गुर्जर साक्ष देऊन गेले. ती साक्ष ऐकली होतीत तुम्ही?”

“नाही.”

“ऑलराईट. मी, रिडरला दिलीप गुर्जरांना मी विचारलेले प्रश्न आणि गुर्जरांनी दिलेली त्या प्रश्नांलची उत्तरं वाचून दाखवायला सांगतो. कृपया ती लक्षपूर्वक ऐका. मी त्यानंतर तुम्हाला प्रश्नल विचारेन. इज धिस ओ.के.?”

“नो प्रॉब्लेम अ‍ॅट ऑल.”

समीरने रिडरला दिलीप गुर्जरांच्या साक्षिमधला ठराविक भाग वाचून दाखवायला सांगितला. वाचता वाचता रिडर एका वाक्यापाशी आला आणि समीरने त्याला थांबायची खूण केली.

“डॉक्टर, आता रिडर जे वाचणार आहे, त्यानंतर मी तुम्हाला प्रश्नव विचारेन.”

“ओ.के.” डॉक्टर म्हणाले. समीर काय विचारणार आहे हे त्यांच्याही लक्षात आलं होतं. ते मंद हसत होते.

समीरने खूण करताच रिडरने प्रश्न वाचून दाखवण्यास सुरूवात केली.

“सरदेसाईंनी दिलीप गुर्जरांना म्हटलं, “तुम्हाला जर इतकी खात्री असेल, तर तुमच्या ज्ञानाला मी आव्हान देऊ शकत नाही, मि. गुर्जर. पण मला एक सांगा, तुम्ही जी ठशांची पोझिशन सांगताय त्यानुसार आरोपीने तो चाकू आपल्या उजव्या हातात धरला होता आणि पात्याचा धार असलेला थोडासा भाग तिच्या करंगळी आणि अनामिकेने झाकला गेला होता. बरोबर?” यावर दिलीप गुर्जर म्हणाले, “अगदी बरोबर.”

रिडरने प्रश्न आणि उत्तर वाचून दाखवल्यावर समीरने आपला मोर्चा पुन्हा डॉक्टरांकडे वळवला.

“हं, डॉक्टर, आता तुम्ही मला सांगा, दिलीप गुर्जरांनी सांगितलेल्या प्रकारे चाकू हातात धरून तो कुणाच्या पाठीत खुपसणं शक्य आहे का?”


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------