पान २१


समीर प्रियाच्या चेहेर्‍यावरच्या एक्स्प्रेशन्स पहात होता. तिच्यावर गुदरलेला प्रसंग कोणत्याही मुलीला भितीदायक वाटणाराच होता.

“प्रिया, तू जेव्हा त्या आडरानातून बाहेर पडलीस तेव्हा एखादं वाहन, सायकल म्हण, स्कूटर म्हण तुला रस्त्यात दिसली होती का?” समीर.

“नाही. म्हणजे आता आठवत पण नाही. मी इतकी घाबरले होते की त्या दुधाच्या टेंपो ड्रायव्हरने लिफ्ट दिली नसती, तर मी पळत पळत पोलिस स्टेशन गाठलं असतं.”

“पोलिस स्टेशनला जाण्याआधी तू कुणाला फोन वगैरे केला होतास?”

“नाही.”

“तू गाडीत असताना दिपकने कुणाला फोन केला होता?”

“हो. तो कुणाशी तरी बोलत होता खरं. पण मला ऐकू गेलं नाही नीटसं. मी नीलबरोबर बोलत होते. नील दिपकच्या बाजूला बसला होता आणि मी मागच्या सीटवर रेहाना आणि सुल्ताना सोबत बसले होते. त्यांच्या हसण्याखिदळण्यात मला नीलचं बोलणंही नीट ऐकू येत नव्हतं. दिपक तर खूपच हळू आवाजात फोनवर बोलत होता.

“तुझं खास कुणाशी असं शत्रुत्वं होतं का? इथे किंवा नाशिकला?”

“नाही, अजिबात नाही.”

“दिपकचे कुणी शत्रू होते?”

“काही कल्पना नाही. तो नाशिकला असताना हूडपणा करायचा पण त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल मला जास्त माहिती नाही.”“मनोजच्या भावाचा, महेश ठाकूरचा. त्यानेच कोर्टात ओरडून ओरडून सांगितलं होतं की ’प्रियाने मनोजला आशेला लावून सोडून दिलं म्हणून त्याने आत्महत्या केली.’

“तुझा महेश ठाकूरशी कधी संबंध आला होता?”

“कधीच नाही. लहानपणीसुद्धा आम्ही कधी बोललो नाही एकमेकांशी.”

“हा जो तुझा कॉल सेंटरमधला मित्र आहे, अमोल. त्याचं कुणाशी अफेअर आहे?”

“हो. सोनिया मेहता नावाची त्याची प्रेयसी आहे. ती आमच्याच प्रोसेसला काम करते.”

“हं. ओ.के. प्रिया, माझं इथलं काम संपलंय. आता कोर्टात भेटू.”

प्रियाचा निरोप घेऊन समीर बाहेर पडला तेव्हा विचारांवर साचलेलं मळभ थोडंस दूर झाल्यासारखं वाटलं त्याला. प्रियाने सांगितलेली हकिकत आणि समीरच्या असिस्टंटने नाशिकला जाऊन प्रियावर झालेल्या पहिल्या केसची आणलेली माहिती हे एकाच चित्राचे दोन तुकडे आहेत असं त्याला वाटत होतं. नशिबाने साथ दिली तर कदाचित केसच्या पुढच्या तारखेला तो सत्य उघड करू शकणार होता.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------