पान २०


“प्रिया, इथे आल्यापासून माझ्या आई-बाबांना वाटतंय की मी खूप पैसे कमावतोय पण माझी काय परिस्थिती आहे, ते मलाच माहीत. त्यातच तुला मी रोज अमोलबरोबर पाहिलं त्यामुळे माझा राग आणखीनच भडकला.”

“म्हणजे? मला समजलं नाही?”“हो. मला चांगलं समजलंय ते. मला माफ कर प्रिया. मला तुझ्याकडून काही नको. फक्त त्यादिवशीच्या माझ्या वाईट वागणूकीबद्दल मला क्षमा कर.”

“अरे, माफी कसली मागतोस? तुला तुझी चूक कळली ना मग बास.”

“नाही नाही, असं नाही.....याचा अर्थ तू मला माफ केलं नाहीस प्रिया.”

“अरे! आता काय केलं म्हणजे तुझी खात्री पटेल?”

“मला माफी आणि आपली पुन्हा मैत्री या दोन्ही गोष्टींसाठी, हे घे....हे चॉकलेट खा.”

दिपकने मला एक चॉकलेट खायला दिलं. मी त्याला माफ केल्यामुळे नव्याने झालेल्या आमच्या मैत्रीचं प्रतिक म्हणून. पण का कोण जाणे मी ते चॉकलेट खाल्लंच नाही. त्याच्या न कळत मी ते चॉकलेट गाडीतून बाहेर फेकलं. त्यानंतर गाडीत एफ. एम. रेडिओवर सुंदर जुनी गाणी लागली होती. डोकं मागे सीटवर टेकवून मी गाणी ऐकत होते. केव्हा डोळा लागला कळलंच नाही. नंतर मला जाग आली ती ’त्या’च जागी...”

प्रियाच्या डोळ्यासमोर त्या दिवशी घडलेला प्रसंग जसाच्या तसा साकार झाला...

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------