पान १९


पण अमोल नुसतं बोलून थांबला नाही. शिफ्ट संपल्यावर आम्ही गाडीत बसलो. अमोलने जाणूनबुजून स्वत:च्या घराजवळ ड्रॉप घेतलाच नाही. म्हणाला, ’प्रियाला ड्रॉप करून मग चालत घरी जाईन.’ दिपकचा नाईलाज झाला. त्याने गाडी माझ्या घराच्या दिशेने वळवली.

करता येणार नाही. माझी नील परेराशी विशेष ओळख नव्हती पण म्हटलं, ’आपल्याच प्रोसेसला आहे तर एकदा रिक्वेस्ट करून पाहू य’. पण नीलनेही नाही म्हटलं.

मला घरी एकटं जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. नील रस्त्यात माझी समजूत काढत होता की शेवटच्या ड्रॉपला इतकं काही घाबरायचं कारण नाही वगैरे, वगैरे. पण त्याला खरी परिस्थिती माहीत नव्हती आणि माहित नसणंच चांगलं म्हणून मीही त्याच्या ’हो’ ला ’हो’ म्हणत होते. रेहाना आणि सुल्ताना गाडीतून उतरून गेल्यावर नील आणि माझ्यामधलं संभाषण जवळजवळ थांबलंच होतं. बाहेर पाऊस सुरूच होता. काही वेळाने नील उतरून गेल्यावर मी डोळे मिटून गाडीत बसले होते. मधेच दिपकने हाक मारली.

“प्रिया, आय अॅम सॉरी.”

“अं....?”

“मी तुझ्याशी तसं वागायला नको होतं, त्या दिवशी. मलाच कळलं नाही मी काय बोलतोय ते.”

त्याच्या बोलण्याचा रोख मला कळत नव्हता म्हणून मी काही प्रतिक्रिया न देता त्याचं बोलणं ऐकत होते.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------