पान १६


तो मला ज्या दिवशी भेटला त्याच रात्री त्याने गळफास लावून आत्महत्या केली. मनोजची आठवण म्हणून मी ते लॉकेट कायम गळ्यात घालायचे. त्या लॉकेटची एक स्पेशालिटी होती. वरून ते साधं सुधं लॉकेट वाटायचं पण त्या लॉकेटच्या आत बोटाच्या पहिल्या पेराएवढं एक पातं दडवलेलं होतं. त्या दिवशी दिपकच्या मानेत मी तेच पातं खुपसलं होतं.

मनोजने मला प्रपोज केलं होतं, ही गोष्ट माझ्या घरी माहित नसली तरी कॉलेजमध्ये बर्‍याच जणांना माहित होती. त्याच्या आत्महत्येनंतर दुसर्‍या दिवशी पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावून घेतलं. सुमारे तासभर ते निरनिराळे प्रश्न विचारत होते. नंतर एक इन्स्पेक्टर आत आला आणि त्याने मला सांगितलं की मनोजचा भाऊ महेश ठाकूर माझ्यावर केस दाखल करणार आहे. माझ्या तोंडचं पाणीच पळालं.

मिळाली होती मुंबईला. माझंही नाशिकमध्ये निरनिराळ्या ठिकाणी नोकरीसाठी अप्लाय करणं सुरूच होतं. पण मनासारखी नोकरी मला मिळेना.

दिपकला मुंबईला जाऊन तीन महिने झाले असतील. एक दिवस त्याची आई आमच्या घरी आली. “दिपकचा फोन आला होता, दिपक खूप खूष आहे तिकडे,” असं बरंच काही माझ्या आईला सांगत होती. मग तिने एकदम तिचा मोहरा माझ्याकडे वळवला.

“तुही पहा की मुंबईला एखादी नोकरी. इथं नाहीतरी तुझं जमत नाहीच आहे आणि इथल्या प्रावेट हॉपिसात काय मिळणार क्लार्क बनून?”

“बरं पहाते.”

“अगं बरं काय? दिपक सांगत होता. तो एका कॉल सेंटरला गाडी चालवतो. तिकडे बर्‍याच मुली काम करतात. पगारपण खूप जास्त मिळतो म्हणे. तुला हवं असेल तर नाव पत्ता देते कंपनीचा.”

“देऊन ठेवा. मी पाहिन चौकशी करून.”


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------