पान १४


“एक मिनिट! आय कान्ट हॅन्डल धिस टेन्शन.... प्रियाने मला कधीही तिचं माझ्यावर प्रेम आहे असं सांगितलं नाही.

सरकारी वकिलांनी मला “साक्षिसाठी हजर रहा,” असं सांगितलं, तेव्हा चर्चा करताना तेच म्हणाले होते की “एखादी मुलगी जर प्रियासारखी वाक्यं तुझ्यासोबत बोलत असेल तर याचा अर्थ असा होतो की त्या मुलीचं तुझ्यावर प्रेम आहे आणि ती ते तुला निरनिराळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतेय.” “म्हणून माझाही गैरसमज झाला होता. पण मला वाटतं प्रिया वॉज जस्ट फ्रेंडली....तिच्या मनात माझ्याविषयी प्रेमभावना होती असं मी ठामपणे सांगू शकत नाही.”

अमोलचं बोलून संपलं तेव्हा त्याच्या चेहेरा वाघाच्या तावडीतून सुटका झाल्यासारखा दिसत होता.

समीर खंदार्‍यांकडे पहात होता आणि खंदारे अमोलकडे पाहून दातओठ खात होते.

समीरने जज्जसाहेबांना अभिवादन करत हसता हसता म्हटलं, “दॅट्स ऑल युवर ऑनर.”

अमोल प्रियाकडे पाहून मान खाली घालून निघून गेला.

“मि. खंदारे तुमचा पुढचा साक्षिदार किती वेळ घेईल?” जज्ज सिन्हांनी विचारलं.

“बराच वेळ घेईल.”

“तर मग त्याला पुढच्या तारखेसाठी राखून ठेवा. वेळ संपत आली आहे.”

“ओ.के. युवर ऑनर.”तिने काही बोलण्याआधीच समीरने तिला तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्याची खूण केली आणि त्याने संपूर्ण रुमची तपासणी केली. वकील आणि अशील यांच्यातलं बोलणं ऐकण्यासाठी व्हिजिटर्स रुममध्ये बर्‍याचदा मायक्रोफोन अड्जस्ट केला जातो, हे समीरला आता चांगलं माहीत झालं होतं. कुठेही मायक्रोफोन लावलेला नाही याची खात्री पटताच तो पुन्हा प्रियाच्या बाकड्याजवळ गेला. प्रिया जाळीच्या पलिकडून समीरच्या बोलण्याची वाट पहात होती.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------