पान १२


“मला ही बातमी सरकारी वकिलांकडून कळली.” वर्मा खाली मान घालून पुटपुटला.

“जोरात बोला मि. बर्मा, तुमचं उत्तर कोर्टाला ऐकू गेलं पाहिजे.” समीर बॅ. खंदार्‍यांकडे एक कटाक्ष टाकत म्हणाला.

“दॅट्स ऑल युवर ऑनर.”

वर्मा निघून गेला तसं बॅ. खंदार्‍यांनी पुढचा साक्षिदार बोलावला.

“अमोल प्रभाकर.”

नाव पुकारताच एक वीस-बाविशीचा युवक साक्षिदाराच्या पिंजर्‍यात येऊन उभा राहिला आणि त्याने शपथ थेतली.

“नाव?”

“अमोल प्रभाकर.”

“काय काम करता?”

“कॉल इंडिया या कॉल सेंटरला कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो.”

“अमोल, समोरच्या पिंजर्‍यात उभ्या असलेल्या तरूणीला ओळखता तुम्ही?”

“ओळखतो. माझ्याच प्रोसेसला काम करत होती ती.”

“प्रियाचे आणि तुमचे संबंध कसे होते?”

“मी प्रियाला मैत्रीण समजत होतं पण तिचं मात्र माझ्यावर प्रेम होतं.”

समीरने चमकून अमोलकडे पाहिलं. प्रियादेखील अमोलचं उत्तर ऐकून अवाक्‌ झाली होती.

“तुमचं प्रियावर प्रेम नव्हतं?”

“नव्हतं.”

“दॅट्स ऑल युवर ऑनर. क्रॉस.” समीरकडे पाहात बॅ. खंदारे म्हणाले.

समीर आपल्या खुर्चीतून उठला आणि शांतपणे एक एक पाऊल टाकत अमोलच्या पिंजर्या.पाशी गेला.

“अमोल, 'बडींग' म्हणजे काय?”

“अं....?” अमोलने आपल्याला प्रश्न नीटसा कळला नाही असं दाखवलं.“ती म्हणायची की तुझ्यासारखा लाईफ पार्टनर ज्या मुलीला मिळेल ती भाग्यवान असेल.”

“आणखी काय बोलायची?”

“असंच काहीतरी सूचक बोलायची.”

“तेच ते सूचक बोलणं ऐकायचं आहे कोर्टाला, बिनधास्त सांगा तुम्ही.” समीरने अमोलच्या नजरेला नजर भिडवत म्हटलं.

“युवर ऑनर, हे आरोपिच्या वकिलांनी काय चालवलंय? आरोपीचं आपल्यावर प्रेम होतं हे साक्षिदाराने आधीच सांगितलंय. साक्षिदार शपथ घेऊन खोटं बोलणार नाही, हे आरोपीच्या वकिलांनी लक्षात ठेवायला हवं.” बॅ. खंदारे उठत म्हणाले.

“माझ्या ते चांगलंच लक्षात आहे, युवर ऑनर,” समीर नम्रपणे म्हणाला पण मला पुन्हा एकदा माझ्या सहकारी मित्राना सांगावंसं वाटतं की कोर्टाला अंदाज नको असतात.

आरोपीच्या काही वाक्यामधून जर साक्षिदाराने काही निराळा अर्थ काढला असेल, तर ती साक्षिदाराची चूक आहे. आरोपीची नाही. उद्या मी पण सरकारी वकिलांना म्हणेन की त्यांच्या नाकासारखं माझं नाक असतं, तर मलाही भाग्यवान असल्यासारखं वाटलं असतं. याचा अर्थ माझं सरकारी वकिलांवर प्रेम आहे, असा होत नाही.”

“कुठून कुठे नेताय प्रकरण, सरदेसाई?” खंदारे वैतागून बोलले. त्यांचं वैतागणं साहजिकच होतं. समीरच्या त्या वाक्यामुळे कोर्टरूम खुसखुसत होती. समीरने पुढे बोलायला सुरूवात केली.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------