Privacy Policy - In English
कार्यक्षम: ३१ मे २०१२ पासून

परिचय

आम्ही कोणती वैयक्तिक माहिती गोळा करतो व कशी?

गोळा केलेली माहिती आम्ही कशी वापरतो?

तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही इतरांना पुरवतो का?

व्यक्तिगत माहिती तुम्ही कशा प्रकारे वापरात आणू शकता व बदल करू शकता?

तुमच्या व्यक्तिगत माहितीची सुरक्षितता आम्ही कशा प्रकारे राखतो?

गुगलसहित तृतीय पक्षी विक्रेत्यांचे गोपनियतेचे धोरण.

Google Affiliate Network च्या माध्यमाद्वारे विक्री करणार्याण तृतीय पक्षी विक्रेत्यांचे गोपनियतेचे धोरण.

बाह्य साईट्स.

ब्लॉग साहित्याचे धोरण.

ब्लॉग टीप्पणीचे धोरण.

गोपनियतेच्या धोरणामधील बदल.


परिचय:

आपल्या व्यक्तिगत माहितीची गोपनियता व सुरक्षितता राखण्यास मोगरा फुलला बांधिल आहे. आमच्या साईटचा वापर करत असताना वापरकर्त्यांकडून गोळा केलेल्या व्यक्तिगत माहितीचा आम्ही काय व कशा प्रकारे उपयोग करतो, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी आम्ही हे गोपनियतेचे धोरण तयार केले आहे.

या ब्लॉग/साईटला किती वापरकर्त्यांकडून भेट दिली गेली व कोणत्या प्रकारचे साहित्य वाचकांमधे जास्त लोकप्रिय आहे ही माहिती आम्ही आम्ही कुकीजच्या माध्यमातून संग्रहीत करतो; सदर कुकीज आपल्या इंटरनेट ब्राऊजरचे सेटींग्ज बदलून अकार्यक्षम करता येतात.

गोपनियता धोरणातील व्यक्तिगत माहिती गोळा करण्याच्या उल्लेखिलेल्या प्रकारांनुसार आम्ही गोळा केलेल्या व्यक्तिगत माहितीचा वापर करतो.

लहान मुलांबद्दल सूचना: ब्लॉगला भेट देणार्याि १३ वर्षांखालील लहान मुलांची कोणतीही व्यक्तिगत माहिती आमच्याकडून जाणूनबुजून संग्रहित केली जात नाही.

आम्ही कोणती वैयक्तिक माहिती गोळा करतो व कशी?

जेव्हा आपण आमच्या साईटवर आपले उत्पादन/ट्रेडमार्क/सेवा यांच्या जाहिराती दाखवण्यासाठी ऑर्डर फॉर्म भरता, तेव्हा आपल्याकडून कंपनीचे नाव, आपले नाव, संपर्काचा तपशील, देश, झिप कोड किंवा पिन कोड, इ. प्रकारची व्यक्तिगत माहिती आम्ही मागवतो.

जर आमच्या साईट किंवा सेवांसंबंधी प्रतिक्रिया पाठविण्यासाठी तुम्ही Contact Us फॉर्म किंवा ई-मेलचा वापर केलात, तर त्या प्रतिक्रियेला उत्तर देता यावे म्हणून आपले नाव व इमेल पत्ता आमच्याकडे संग्रहित केला जातो.

आमच्या सेवांमधे सुधारणा करण्यासाठी आम्ही आपल्याला स्वेच्छेने करावयाचे गोपनीय सर्वेक्षण करण्यास सांगू शकतो. सर्वेक्षणामधील उत्तरे गोपनिय राखली जातील. जर या सर्वेक्षणात आपण भाग घेऊ इच्छित नसाल, तर भाग घेण्याची विचारणा केली गेल्यास आपण नकार देऊ शकता.

गोळा केलेली माहिती आम्ही कशी वापरतो:

मोगरा फुललाच्या सेवा व साहित्य आपल्याला हवे तसे उपलब्ध करून देता यावे म्हणून आपल्याकडून व्यक्तिगत माहिती गोळा केली जाते. या सेवांमधे, जर आपण आम्हाला परवानगी दिलीत, तर आमच्या नवीन कथेची घोषणा करणारे इमेल आपल्याला पाठवणे यासारख्या गोष्टींचा अंतर्भाव असेल. आमच्या अद्ययावत केलेल्या सेवा, बदल व आपल्या विनंत्यांना उत्तर पाठवणे या गोष्टींसाठी आपल्या व्यक्तिगत माहितीचा वापर आमच्याकडून केला जातो.

जर आपण स्वेच्छेने आमच्याशी संपर्काचा पर्याय निवडला असेल, तर आम्ही वेळोवेळी आपल्याला नि:शुल्क माहितीपत्रके व इमेल्स पाठवू ज्यात आमच्या साईटचा वापर करण्यासाठी थेट प्रोत्साहन दिलेले असेल आणि सोबत तृतीय पक्षांच्या जाहिराती असण्याची शक्यता आहे.

तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही इतरांना पुरवतो का:

या गोपनियतेच्या धोरणामधे किंवा सूचनेमधे स्पष्ट उल्लेख केलेला नसेल, तर आपल्या गोळा केलेल्या व्यक्तिगत माहितीचा आपल्या परवानगीशिवाय आम्ही व्यापार किंवा विक्री करत नाही अथवा भाड्याने देत नाही. जर आपण ब्लॉगर कमेंट फॉर्म किंवा डिस्कस कमेंट फॉर्मचा वापर करून आम्हाला एखादे प्रशस्तीपत्रक पाठवले किंवा टीप्पणी दिलीत, तर सदर माहिती आम्ही आमच्या ब्लॉग टीप्पणीच्या धोरणाचे पालन करून दिली आहे हे पडताळून पाहू व नंतर आमच्या साईटवरील प्रतिक्रियांमधे प्रकाशित करू. सदर प्रतिक्रियेच्या वर, जर आपणांकडून दिले गेले असेल तर, आपले नाव व आडनाव प्रकाशित करण्यात येईल व इतर वाचक व वापरकर्ते ही माहिती पाहू शकतील.

व्यक्तिगत माहिती तुम्ही कशा प्रकारे वापरात आणू शकता व बदल करू शकता:

प्रतिक्रियांमधे प्रकाशित झालेली आपली व्यक्तीगत माहिती आपण स्वत: नष्ट करू शकता. मात्र इमेल, Contact Us फॉर्म व ऑर्डर फॉर्मचा वापर करून आमच्याकडे पाठविलेली माहिती पहाण्याची मोकळीक फक्त मोगरा फुललाकडेच आहे.

तुमच्या व्यक्तिगत माहितीची सुरक्षितता आम्ही कशा प्रकारे राखतो:

सुरक्षिततेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो. आपल्या व्यक्तिगत माहितीचा कोणताही दुरूपयोग, अनधिकृत उपयोग, प्रकटीकरण, बदल व फेरफार, हानि पोहोचू नये अथवा ही माहिती नष्ट होऊ नये यासाठी आम्ही योग्य व आवश्यक अशी सर्व खबरदारी घेतो.

गुगलसहित तृतीय पक्षी विक्रेत्यांचे गोपनियतेचे धोरण:

अ] तृतीय पक्षी विक्रेते आपल्या जाहिराती दाखविण्यासाठी वापरकर्त्याच्या या वेबसाईटवरील पूर्वीच्या भेंटीवर आधारीत कुकीजचा वापर करतात.

आ] गुगलचा DART कुकीजचा वापर त्यांना आणि त्यांच्या सहयोगी जाहिरातदारांना, वापरकर्त्यांसाठी या साईट व/किंवा इंटरनेटवरील अन्य साईट्सच्या त्यांच्या एकूण वापरावर आधारित माहितीनुसार जाहिराती पुरविण्यास मदत करतो.

इ] वापरकर्ते Google ad and content network privacy policy व/किंवा Network Advertising Initiative opt-out page या पानांना भेट देऊन DART कुकीजच्या वापरामधून बाहेर पडू शकतात.

Google Affiliate Network च्या माध्यमाद्वारे विक्री करणार्यार तृतीय पक्षी विक्रेत्यांचे गोपनियतेचे धोरण:

जेव्हा आपण आमच्या वेबसाईटला भेट देता, तेव्हा जाहिराती दाखविण्यासाठी आम्ही तृतीय पक्षी जाहिरातदार कंपन्यांचा वापर करतो. या कंपन्या आपल्याला अनुकूल असू शकणार्याय त्यांच्या उत्पादनांच्या व सेवांच्या जाहिराती या साईटवर दाखविण्यासाठी आपल्या माहितीचा (आपले नाव, पत्ता, इमेल अॅ्ड्रेस किंवा दूरध्वनी क्रमांक या व्यतिरिक्त) वापर करू शकतात. यापैकी सर्वच नाही, पण काही कुकीजमधून बाहेर पडण्यासाठी, वापरकर्ते www.networkadvertising.org/managing/opt_out.asp या Network Advertising Initiative's opt-out website च्या पानावर जाऊ शकतात.

सुरक्षित इंटरनेटच्या अधिक माहितीकरता, गुगलने पुरविलेल्या http://www.google.com/familysafety या ठिकाणी अधिक माहिती मिळवता येईल.

बाह्य साईट्स:

आमच्या वेबसाईटवर इतर हितसंबंधी वेबसाईट्सच्या (यात तृतीय पक्षी जाहिरात सेवा ज्या जाहिरातदारांना सेवा पुरवितात त्यांच्या देखील समावेश आहे) लिंक्स आहेत. मात्र, जर आमच्या वेबसाईटवरून बाहेर पडण्यासाठी आपण या लिंक्सचा वापर केलात, तर त्या संबंधित वेबसाईटवर आमचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही, याची कृपया नोंद घ्यावी. सबब, अशा साईट्सना भेट देताना आपण त्यांना पुरवत असलेल्या कोणत्याही माहितीच्या सुरक्षिततेची व गोपनियतेची जबाबदारी आमच्यावर नाही आणि सदर साईट्स आमच्या साईटवरील गोपनियता धोरणानुसार नियंत्रित केल्या गेलेल्या नाहीत. आपण खबरदारी बाळगावी व सदर प्रकारच्या वेबसाई्ट्सना लागू असलेल्या गोपनियता धोरणाकडे लक्ष द्यावे.

ब्लॉग साहित्याचे धोरण:

१. आम्ही प्रौढांसाठी असलेलं असं साहित्य, कथा प्रकाशित करत नाहीत. मात्र आमच्या कथांमधील साहित्य हे १३ वर्षांवरील व्यक्तीसाठी वाचण्यास अनुकूल आहेत, असे आम्हाला वाटते.

२. आजतागायत आम्ही सत्यघटना किंवा वास्तविक व्यक्तींवर आधारित कोणतीही कथा लिहिलेली नाही, तसेच आमच्या भयकथा, अद्भूतकथा व इतर कोणत्याही शैलीत लिहिलेल्या कथांमधून आम्हाला अंधविश्वासदेखील पसरवायचा नाही. या ब्लॉगवर स्वलिखित कथा प्रकाशित करण्यामागे मनोरंजन देणे हा शुद्ध हेतू बाळगलेला आहे. आमच्या कथा व सत्यघटना किंवा वास्तविक व्यक्तीमधे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे. आमच्या आगामी कथांपैकी कोणतीही कथा जर सत्यघटना किंवा वास्तविक व्यक्तीच्या जीवनावर आधारित असेल, तर आम्ही कथेच्या परिचय पृष्ठावर तसे स्पष्टपणे नमूद करू.

३. या वेबसाईटवरील सर्व मूळ साहित्य हे प्रताधिकाराधीन सुरक्षित आहे.

ब्लॉग टीप्पणीचे धोरण:

टीप्पणी व प्रतिक्रियांचे या वेबसाईटवर स्वागत आहे, मात्र पुढील काही प्रसंगांमधे टीप्पण्या किंवा प्रतिक्रिया संपादित अथवा नष्ट केल्या जातील:

१. स्पॅम अथवा संदिग्ध आशयाच्या प्रतिक्रिया नष्ट केल्या जातील. प्रासंगिक साहित्यावरील प्रतिक्रियेसोबत लिंक जोडण्याची अनुमती आहे मात्र सदर प्रतिक्रिया आपल्या वेबसाईट/ब्लॉगची केवळ जाहिरात नसून विषयाशी संबंधित अशी असावी.

२. असभ्य व आक्रमक भाषा किंवा तशी कृती सुचविणार्याे प्रतिक्रिया नष्ट केल्या जातील.

३. एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर टीकात्मक भाष्य करणारी करणारी प्रतिक्रिया नष्ट केली जाईल.

४. कोणतीही प्रतिक्रिया, कुठल्याही सूचनेशिवाय नष्ट व संपादित करण्याचा अधिकार या ब्लॉगच्या मालकांनी राखून ठेवलेला आहे. हे ब्लॉग टीप्पणीचे धोरण कोणत्याही क्षणी बदलले जाऊ शकते.

गोपनियतेच्या धोरणामधील बदल:

या गोपनियतेच्या धोरणामधे वेळोवेळी फेरबदल करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवला आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही या साईटचा वापर कराल, तेव्हा त्यावेळेस अद्ययावत केलेली गोपनियता पद्धती आपल्या वापरावर लागू होईल. जर साईटवर आम्ही कोणताही महत्त्वपूर्ण बदल केला, तर तो बदल केव्हापासून लागू होत आहे याची आगाऊ सूचना आम्ही साईटवर देऊ. सबब, आपण प्रत्येक वेळेस जेव्हा या साईटचा उपयोग कराल, तेव्हा या गोपनियतेच्या धोरणावरून नजर फिरवत जा.

या गोपनियतेच्या धोरणासंबंधी आपले प्रश्न व प्रतिक्रियांचे स्वागत आहे. कृपया kanchan@kanchankarai.com. येथे इमेल पाठवा.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------